श्रीकृपा न्यास
रातराणी
ए ए रातराणी, होऊ नको दिवाणी
जगताही वेड्यावाणी, करू नको की? || १ ||
ए ए रातराणी, तुझी न होई वेणी
गंध नुरे अंगणी, दुजे क्षणी की? || २ ||
ए ए रातराणी, ही जुई तव साजणी
ति पिनाकिनाचे चरणी, तू दूरी का ? || ३ ||
ए ए रातराणी, ति बघ कमळिणी
उगवे जै दिनमणी, उमलो लागे || ४ ||
ए ए रातराणी, तू वनी मस्तानी
तव हात धराया कोणी आतुर नाही || ५ ||
ए ए रातराणी, तुज गंध देई धरणी
जो तिचाचि तो न गणी, तुझा जणू की || ६ ||
ए ए रातराणी, ति धरा आपणा खाणी
जी देवजीची करणी, अनादि काळी || ७ ||
ए ए रातराणी, त्या देवाजीची गाणी
वेडे म्हणू विराणी तू मी आता || ८ ||
ए ए रातराणी, या नवीन जीवन वळणी
रमता मी-तू पणी नुरलो आता || ९ ||
