श्रीकृपा न्यास
आनंदी मन
हांसते मन माझे नाचते
नाचते मन माझे हासते || धृ ||
समोर वनराजी ही सुंदर
दाट बहरले वृक्ष पुरे पुर
मधून हसतो त्यातुन निर्झर, मार्गी जल धावते || १ ||
उंच हे कडे भंवतीचे
रक्षण जणू हे वनराणीचे
भाव न त्यां, गंभीर सदाचे, दृष्टी न त्यां पोचते || २ ||
सभोवताली मंजुळ किलबिल
बाजुस ओढ वाहे झुळुझुळु
पर्णांचीही हळूच सळसळ, कवन मूर्त होते || ३ ||
त्या कावनाने भाव विसरले
भाव विसरले हे ही गेले
क्षण कांही ना कांही उरले, हळुच जाग येते || ४ ||
