श्रीकृपा न्यास
श्रीगुरुवंदना
मी वंदितो पाय हे श्री गुरुदेव
स्वीकारुनी दाविला, तू तुझा ठाव || धृ ||
बहु जन्म अज्ञान, तनुविण ना भान, विषयींच गुणगान
जगती सदा भाव || १ ||
जरी मी किती बद्ध, बहु पुण्य ते शुद्ध, केलेसि तू विद्ध
पळण्यासि ना वाव || २ ||
तव दास वेदान्त, आनंद तू शांत, किती मी भ्रांत
मार्गी तुझी नाव || ३ ||
‘ मी ब्रह्म ‘ हा छंद, झालो तये धुंद,
आता न तो गंध ना साथ, ना ठाव || ४ ||
आहेचि ते होय, गति ना नसे सोय,
मी सेवुनी साय या सृष्टीचा राव || ५ ||
