श्रीकृपा न्यास
टाळ
झन् झन् झन् झन् गाजे | झन् झन् झन् गाजे |
टाळ वाजे हरि मंदिरी || धृ ||
भाव फुले विठ्ठलाचा | कपी डोले श्रीरामाचा
डोळा खुले शंकराचा | सगुणाची बाजे बासुरी || १ ||
रंगे कथा ज्ञानेशाची | संगे वाणी तुकयाची
बोले जनी नामयाची | रामदास भरे अंतरी || २ ||
एकी होये जिवा शिवा | ठाव नाही कोठे भवा
आनंदाचा भेटे ठेवा | डोल देई दहरांबरी || ३ ||
