श्रीकृपा न्यास
गावी आनंदाची गाणी
गावी आनंदाची गाणी
जीवन अiवावरचे पाणी
सदाचि गावी जीवनांत या आनंदाची गाणी…..।।ध्रु।।
कर्म करावे जे देवा आवडे
ते न करावे जे जीवा नावडे
“अहं अहं’चे सदा असो वावडे
दैन्य आणि दुःखाते पाहुनि डोiां यावे पाणी….।।1।।
देव पहावा सदाचि तू अंतरी
तोचि पहावा बाहेरी जगभरी
नाम तयाचे घेऊ दे वैखरी
त्या तालावर जीवन जगणें असो नसो की कोणी…।।2।।
मनीं धरी श्रीगुरूंचे सांगणें
ध्यानी सो@हं वरीच आरूढणें
भेदावाचूनि जग सारे पाहणें
त्या दृïीची अंत:करणीं अखंड ¿यावी धणी……।।3।।
आतां देही फिरुनि नाही येणें
कोण म्हणें तो आम्हां येणें जाणें
तो सत्याचे रहस्य कांहीं नेणें
सत्य असे ते सहज बोलते संतांची ती वाणी….।।4।।
